Vastushri Group

Vastushri Group

माणूस लहान असो वा मोठा,श्रीमंत असो वा गरीब,सुशिक्षित असो वा अशिक्षित प्रत्येकाच्या मनात एक घर असत.अगदी लहानपणापासून,समजायला लागल्यापासून तो घर बंधू लागतो-पत्त्याच,वाळूच,शिंपल्याच,काड्यांच…..आयुष्यात एकदाही भातुकली, घर…घर न खेळलेल मूलं सार जग शोधलं तरी सापडणार नाही.

प्रत्येकाच्या मनात एक स्वप्न असत.प्रत्येकाच्या स्वप्नात एक घर असत.झोपडीत राहणाऱ्याला बंगला बांधायचा असतो.बंगल्यात राहणाऱ्याला चंद्रमौळी झोपडी खुणावत असते.लहान घरात राहणाऱ्याला मोठ घर आवडत, मोठया घरात राहणारयाला लहान घर सोयीस्कर वाटत.प्रत्येकाच वाटन बरोबरच असत.प्रत्येकाच स्वप्न त्याचं स्वतःच असतं…